वनमंत्री संजय राठोड यांच्या हकालपट्टीसाठी भाजप महिला मोर्चाचे रस्ता रोको

राजकारण

नांदेड,बातमी24:- मयत पूजा राठोड मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा थेट संबंध आहे,या प्रकरणी संजय राठोड यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी,यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने शिवाजी नगर उड्डाणपूल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दोन तास चालले, त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळीआंदोलक व पोलीस यात वाद झाला. हे आंदोलन भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष प्रणिती चिखलीकर-देवरे, जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, महिला जिल्हाध्यक्ष
चित्ररेखा गोरे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आले.

संजय राठोड यांच्या निषेधाचे फलक व भाजपाचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने महिला व भाजप कार्यकर्ते दाद-याच्या मध्यभागी ठाण मांडून बसले. रस्ता रोको केल्यामुळे उत्तर भागातील वाहने आयटीया पर्यंत तर दक्षिण भागातील वाहने मुथा चौक पर्यंत खोळंबळी होती. यावेळी आघाडी शासन, संजय राठोड यांच्याविरोधात प्रचंड घोषणा दिल्यामुळे वातावरण दणाणून गेले.

या आंदोलनात दिलीप कंदकुर्ते,मिलिंद देशमुख,महादेवी मठपती,
अनिलसिंह हजारी,गंगाधर कावडे,
मनोज जाधव,वैजनाथ देशमुख,संजय घोगरे,संतोष परळीकर,सूर्यकांत कदम,अशिष नेरलकर,संतोष क्षिरसागर,अनिल जगताप
,कुणाल गजभारे,शंकरराव मनाळकर,अरुण पोफळे,पोर्णिमा बेटमोगरेकर,संगीता झुंजारे,राज यादव,केदार नांदेडकर,अपर्णा चितळे यांच्यासहशेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.