पंकजा मुंडे करणार नुकसानीची पाहणी

राजकारण

नांदेड, बातमी24ः माजी ग्रामविकासमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या मंगळवार दि. 20 रोजी दुपारी जिल्हयाच्या दौर्‍यावर येणार आहेत. या दरम्यान त्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून परभणी जिल्ह्यात जाणार आहेत.

पंकजा मुंडे यांचे अडीच वाजता विमानाने नांदेड विमानतळावर आगमन होणार असून पावणे तीन वाजता आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी राखीव असेल, त्यानंतर मोटारीने धनगरवाडी, पारडी, व कारेगाव येथील पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्या पाहणी करून गंगाखेडकडे प्रयान करतील, पाच वाजता त्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फ डणविस यांच्यासमवेत शेतकर्‍यांनी संवाद साधणार असल्याचे कळविण्यात आले आहे.