नगरसेवक बापूराव गजभारे यांच्या पुढाकारातून लसीकरण जागृती

राजकारण

 

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या महामारीने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हजारो लोक बाधित झाले तर शेकडो लोकांना कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण गमवावे लागले आहे.पहिल्या लाटेप्रमाणे दुसरी लाट ओसरत आहे.मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.त्यामुळे लसीकरण करणे हा एकमेव पर्याय असून लसीकरणबाबत नागरिकांच्या मनात असलेले समज-गैरसमज दूर करणे हा जनजागृतीचा महत्वाचा भाग आहे. राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून प्रभाग क्रमांक 10 चे पीआरपी -काँग्रेस आघाडीचे नगरसेवक बापूराव गजभारे यांनी स्व-खर्चातून एल.ई. डी. व्हॅन द्वारे प्रभागातील सर्वच भागात जनजागृती करत लसीकरण करून घेण्याचे आवाहन प्रभागातील नागरिकांना केले.

कोरोनाच्या महामारील रोखण्यासाठी जगभर झालेल्या संशोधनाअंती लसीकरण जास्तीत जास्त करणे हा पर्याय आहे. त्यामुळे जगभरात लसीकरण मोहीम सर्वत्र राबविली जात आहे. परंतु लसीकरण करणे जितके महत्वाचे आहे,तितकेच लसीकरणाबदल समाजात समज-गैरसमज सुद्धा आहे. नागरिकांच्या मनातील लसीकरणाबद्दल असलेले गैरसमज दूर करणे आजघडीला आवश्यक आहे.

लसीकरणाची टक्केवारी वाढली पाहिजे,यासाठी नगरसेवक बापूराव गजभारे यांनी पुढाकार घेत प्रभाग क्रमांक-10 मधील सर्व गल्ली-मोहल्यामधील नागरिकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढे आले पाहिजे,यासाठी सलग तीन दिवस जनजागृती अभियान एल.ई.डी. मोबाईल व्हॅनद्वारे राबविण्यात आले.प्रथमच डिजिटल माध्यमाद्वारे जनजागृती करण्यात आली.या अभियाना अंतर्गत या प्रभागातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

प्रभागातील अण्णाभाऊ साठे चौक, टाउन मार्केट सोसायटी
दत्तनगर ,अशरफ नगर, हिंगोली गेट,महाराणा प्रतापसिंह चौक,सलीम किराना, शिवनगर,गंगा नगर सोसायटी,सखोजी नगर, मित्र नगर,तानाजी नगर, विनायक नगर,पटेल कॉलोनी या भागाचा समावेश होता,असे बापूराव गजभारे यांनी सांगितले.