नांदेड, बातमी24ः- उपकर योजनेंतर्गत अनुदानावर आधारीत कृषी साहित्य खरेदीचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी केले आहे.
सभापती रावणगावकर म्हणाले, की
शेतकर्यांना उपकर योजनेंतर्गत अनुदानावर बॅटरी कम हॅन्ड ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेअर, ताडपत्री, 3 एचपी / 5 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच, पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर), दोन ते चार फाळी पल्टी नांगर व पॉवर टिलर इत्यादी कृषि साहित्य, यंत्राचा लाभ देण्यासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
एकूण लाभ दयावयाची लाभार्थी संख्या 250 एवढी आहे. ताडपत्रीसाठी अनुदान 2 हजार रुपये, एकुण 400 लाभार्थी. 3 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संचासाठी अनुदान 10 हजार रुपये, एकुण 53 लाभार्थी. 5 एचपी ओपनवेल सबमर्शिबल पंप संच अनुदान 15 हजार रुपये एकूण 53 लाभार्थी. पॉवर ऑपरेटेड चाफ कटर (कडबा कटर) साठी अनुदान 15 हजार रुपये एकूण 136 लाभार्थी. दोन ते चार फाळी पल्टी नांगरासाठी किंमतीच्या 50 टक्के जास्तीत जास्त 40 हजार रुपयाच्या मर्यादेत अनुदान, एकूण 12 लाभार्थी तर पॉवर टिलरसाठी अनुदान 50 हजार रुपये प्रति औजार याप्रमाणे असून एकूण 8 लाभार्थ्यांची संख्या आहे.
अधिक माहितीसाठी गरजू शेतकर्यांनी पंचायत समितीचे कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी संतोष नांदरे यांनी केले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…