नांदेड,बातमी24:- राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुधनाचे विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावे आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरते पशु चिकित्सा वाहन मिळाले असून यांचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येत आहे.
कोविडची परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या विविध निकषाचे पालन करुन जिल्हा परिषदेच्या प्रागंणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार रावसाहेब अंतापुरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार राम पाटील रातोळीकर ,आमदार भिमराव केराम, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार तुषार राठोड, जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती पदमा सतपलवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब कदम रावणगावकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाबाई पाटील बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी इतर पदाधिकारी व पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.
सदर फिरते पशु चिकित्सा वाहन सद्यस्थितीत भोकर, हदगाव व देगलूर या तीन तालुक्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. पशु आहार व आरोग्याबाबत पशु वैद्यकीय तज्ञामार्फत मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध असणार आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…