कृषी

नांदेडसह अनेक भागात अतिवृष्टी;कोणत्या भागात किती पडला पाऊस

नांदेड, बातमी24ः काही दिवसांपासून खंडीत झालेल्या पावसाने मागच्या चौविस तासांमध्ये जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चांगलाच सुखावला आहे. गत चौविस तासांमध्ये पाऊस नोंदविला गेला आहे. यात नांदेड तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे.

मागच्या चौविस तासात कंधार, उमरी, देगलूर,माहूर, धर्माबाद, हिमायतनगर, मुखेड, बिलोली, हदगाव, नांदेड, लोहा, नायगाव, भोकर, अर्धापुर, किनवट,मुदखेड अशा सर्वच तालुक्यांमध्ये कमी-अधिक पाऊस झाला, असून सर्वाधिक पाऊस अर्धापुर तालुक्यात पडला आहे. आतापर्यंतचा सर्वात जास्त पावसाची नोंद अर्धापुर तालुक्यात झाली आहे. त्यानंतर नांदेड तालुक्यातील सर्वच्या सर्व मंडळात अतिवृष्टी झाली आहे. नायगाव तालुक्यातील मांजराम मंडळात 111 मिलीमिटर तर त्यापेक्षा जास्त अर्धापुर तालुक्यातील दाभाड मंडळात 117 मिलीमिटर पाऊस नोंद झाली असून या वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद याच मंडळातील आहे.

——-
चौकट
तेरा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर
कंधार, उस्मानगर, फु लवळ, बारुळ,देगलूर तालुक्यातील मरखेल,हणेगाव, बिलोली तालुक्यातील लोहगाव, लोहा तालुक्यातील माळाकोळी, नायगाव, नरसी, कुंटर,भोकर तालुक्यातील मातुळ, मुखेड तालुक्याती जांब, जाहूर या मंडळात 50 मिली मिटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.हदगाव, हिमायतनगर, किनवट व माहुर तालुके वगळले तर इतर सर्वच तालुक्यात पाऊस झाला आहे.
——-
मंडळनिहाय अतिवृष्टी

मंडळाचे नाव———-अतिवृष्टी नोंद
1) नांदेड शहर———–77 मिली मिटर

2) तुप्पा—————90 मि.मी

3) विष्णुपुरी————67 मि.मी

4) वसरणी————-80 मि.मी

5) वजिराबादब———-73 मि.मी

6) नांदेड ग्रामीण———80 मि.मी

7) तरोडा————–83 मि.मी

8) मालेगाव, देगलूर——-82 मि.मी

9) धर्माबाद————68 मि.मी

10) कलंबर,लोहा——–74 मि.मी.

11) मांजरम, नायगाव—–111 मि.मी

12) अर्धापुर———-97 मि.मी

13) दाभाड, अर्धापुर———–117 मि.मी

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago