नांदेड,बातमी24:- अतिवृष्टी अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी शेतकर्यांजवळ आपल्या शेतातील पिकांचा पिकविमा संरक्षण असणे अत्यंत आवश्यक असून यासाठी शेतकर्यांनी पुढाकार घ्यावा,तसेच शेतकरी सन्मान योजनेसाठी बँकेच्या अधिकारी यांच्याशी समन्वय साधून मदत करू,असे भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी सांगितले.
भारत सरकार मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केला. महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी सन्मान योजना लागू केली असून या अंतर्गत पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे,या विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकर्यांनी सहभाग घेऊन पिक विमा हप्ता भरण्यासाठी शेवटच्या आठवड्याची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरून घ्यावा.असे आवाहन साले यांनी केले.
यावेळी चालू खरीप हंगाम सन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यासाठी इफको टोकियो जनरल इंशुरन्स कंपनी लि. या कंपनीची तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे,या योजनेत शेतकर्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) सहभागी होण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2020 आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांना ऐच्छिक आहे. पण सर्वच शेतकर्यांनी पीक विमा भरावा आपले शेताचे संरक्षण करावे,या साठी आपल्या मदत लागत असल्यास नांदेड दक्षिण मधील बालाजी पाटील पुयड,सुनील मोरे व नांदेड उत्तर प्रताप पावडे,बंडू पावडे,संतोष क्षीरसागर हे भाजपा पदाधिकार्यांशी संपर्क करण्याचे आवाहन साले यांनी केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…