नांदेड, बातमी24ः सध्या मूग उडीद हंगाम आला असून अडचणीतल्या शेतकर्यांची व्यापार्याकडून लूट होऊ शकते, त्यामुळे शासनाने तातडीने मूग, उडीदाची किमान आधारभूत किंमत देऊन खरेदी करून शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी ना. जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांना निवेदन देऊन मूग उडीद या धान्यांना आधारभूत किंमत देऊन राज्य शासनाने तातडीने खरेदी करावी अन्यथा व्यापारी ओलावा व इतर कारणे दाखवत शेतकर्यांचीची लूट करू शकतात,ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिली.अतिवृष्टी व इतर संकटाचा सामना करणार्या शेतकर्यांना शासनाने दिलासा देणे आवश्यक आहे अशी मागणी निवेदनाद्वारे त्यांनी केली.
शेतकर्यांसाठी अण्णा पुन्हा सक्रिय…..
पूर्ण हयातभर शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नासाठी लढणारे शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे मागील काळात सक्रिय राजकारणातून काहीसे अलिप्त असल्या कारणाने चर्चा होत असतानाच ! शेतकर्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होत मूग उडीद या धान्यांची आधारभूत किमत देऊन सरकारने खरेदी करावी ही मागणी सरकारला करत त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…