नांदेड,बातमी24:- काल हल्ला बोलच्या निमित्ताने पोलिसांवर शीख समाजाकडून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. जमावांनी केलेल्या तलवारबाजी पोलीस अधीक्षक शेवाळे यांचे अंगरक्षक सह सात ते आठ पोलीस कर्मचारी व अधिकारी गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर पोलिसांचे आत्मबळ खचले,असून अशा पोलिसांना तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना यांची प्रकर्षाने आठवण येऊ लागली आहे, यातील काही पोलिसांनी व्हाट्स अप वर मीना यांचा फोटो ठेवत साहेब तुम्ही आज नांदेडला हवे होता, अशी आठवण काढली.
प्रति वर्षी होळीच्या निमित्ताने हल्ला बोलची मिरवणूक काढली जाते, मात्र यंदा लॉकडाउन असल्याने धार्मिक,सांस्कृतिक व राजकीय सर्व कार्यक्रमांना बंदी आहे.यातच हल्ला बोल मिरवणूक काढू नये,यासाठी पोलिसांनी कळविले होते.तरी गुरुद्वारामध्ये शेकडो जणांचा मोब जमला होता, जमावाने गेट तोडत,पोलिसांवरच हल्ला बोल चढविला,यात पोलिसांना तलवार,चालू व भाले याने मार खावा लागला.
जमाव इतक्यावरच थांबला नाही तर पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यावर चढून आला.त्यांच्यावर घातलेला घाव अंगरक्षक दिनेश पांडे यांनी झेलत स्वतः गंभीर जखमी झाले.त्यानंतर जमावाने पोलिसांच्या गाड्या फोडल्या,शेवटी हल्ला बोलची मिरवणूक काढलीच.
——
पोलिसांचा दुबळेपणा समोर
हल्ला बोल मिरवणूक काढली जाऊ नये,यासाठी पोलिसांकडून विरोध झाल्यास गंभीर हल्ला होउ शकतो,इतके ही पोलिसांना खबर मिळू शकली नाही,आतील माहिती न मिळणे हे सुद्धा पोलिसांचा दुबळेपणा समोर येतो.
——
षडपणा उघडकीस
पोलीस जमावाच्या तलवारीपुढे दुबळेपणा हे समोर आले. पोलीस अधीक्षक यांच्यावर प्राणघातक हल्ला केला गेला,असला तरी पोलिसांनी कुठला ही प्रतिकार केला नाही,किमान अश्रूधुराचे नलकांडे फोडू शकले असते, फार झालं रबर गोळ्या झाडत आल्या असत्या, शेवटी हवेत फायर ही करता येऊ शकले असते,जीवाचे रक्षण करताना प्रतीवॉर करणे यात गैर नसावे,पोलीस मात्र हेच विसरले,त्यामुळे वर्दी जखमी झाली आणि पोलीस मानसिकरित्या खचून गेले.
——
म्हणून पोलीस बंधू करतात येत मीना यांची आठवण
तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना हे सध्या अमरावती विभागाचे डीआयजी आहेत,नांदेड येथे असताना अनेकांची दादागिरी संपुष्टात आणली. तसेच कुख्यात गुंडांना पळवून लावले.पोलिसांवर दमगिरी करणाऱ्यांना ढोपरा पर्यंत सोलून काढले. कुणाच्या ही बापाला न घाबरणारा अधिकारी ओळख त्यांनी निर्माण केली होती. यातून पोलीस यांनी सुध्दा मीना यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले, कदाचित त्यामुळेच नांदेड पोलिसांना मीना यांची आजच्या क्षणी आठवण येत असावी. पोलिसांनी व्हाट्सएपच्या डीपीवर मीना यांचे फोटो ठेवले.हे त्याचेच धोतक आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…