नांदेड, बातमी24:-त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्त मुस्लिम समुदायाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत दुकानासह गाड्याचे नुकसान झाले,असून यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी सुद्धा जखमी झाले.यात पोलीस अधीक्षक यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे समोर आले.या प्रकारानंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून जागोजागी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दुपार नंतर जमावाने नांदेड शहरातील पावडेवाडी नाका,शिवाजी नगर व देगलूर नाका भागात दगडफेक करत दुकानांचे नुकसान केले.यावेळी काही गाड्यावर ही दगडफेक करून नुकसान करण्यात आले.या घटनेनंतर व्यापार्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
देगलूर नाका भागात जमावाने मोठी दगडफेक करत दहशत माजवली,यावेळी जमावाने पोलिसांच्या दिशेने केलेल्या दगडफेकीत इतवारा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरवाडे हे जखमी झाले.याच सोबत काही पोलीस कर्मचाऱ्यांना दगडांचा मार बसला. जमावाला पागविण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुरांच्या नलकाड्या फोडण्यात आल्या. पोलिसांकडून संशयित आरोपींचे धरपकड सुरू केली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…