क्राईम

अबब…नांदेडचे खासदार ही असुरक्षित;10 कोटी द्या अन्यथा जीवे मारू;सात महिन्यांपूर्वीची  धमकी निवेदनामुळे समोर

नांदेड, बातमी24:-संजय बियाणी यांच्या हत्येनंतर नांदेड शहरातील वातावरण ढवळून निघालेले असताना भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना सात महिन्यांपूर्वी दहा कोटी रुपये दे अन्यथा सर्व कुटूंबाला मारून टाकू असे धमकी पत्र आल्याची माहिती आज समोर आली.या जुन्या धमकीच्या पत्राने आज नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नांदेडचे खासदर ही सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न पडला आहे.

खासदर प्रताप पाटील चिखलीकर यांचे मित्र असलेल्या संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या पंधरा दिवसांपूर्वी झाली होती.या घटनेच्या निषेधार्त भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार दि.20 रोजी निदर्शने करण्यात आली.त्यानंतर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावेळी प्रताप पाटील चिखलीकर यांना आलेल्या पत्रा विषयी पुन्हा समरणपर निवेदन देण्यात आले.

मी खासदार झाल्यानंतर रिंदा नामक गुंडाकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मला माझ्या कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली.त्यावेळी मी प्रशासन निवेदन दिले होते.हे पत्र पोलीस अधीक्षक, विशेष महा पोलीस निरीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले असल्याचे चिखलीकर याना निवेदनात नमूद केले. मला आतापर्यंत पोलीस संरक्षण दिलेले नाही,यात राजकारण आड येत असल्याचे चिखलीकर यांनी स्पष्ट केले.माझ्या सारख्या संसद सदस्यास असे धमकी पत्र आले,मात्र हे प्रकरण पोलीस प्रशासनाने गंभीररीत्या हाताळले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago