नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या महामारी काळात एकमेव शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व त्यांची वैधकीय यंत्रणा दिवसरात्र एक करून रुग्णसेवा बजावत आहे. अशाच वैधकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यास भोकसण्याचा प्रयत्न झाला.मात्र लोकांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
कोरोनाच्या संकटाचा योद्धा म्हणून सामना करणाऱ्या डॉक्टर व त्यांची यंत्रणा जीवापाड काम करत आहे. यातील रुग्णांचे प्राण ही वाचत आहेत. काम करताना यंत्रणेवर येणारा ताण प्रचंड असा आहे. अशा परिस्थितीत काम करणाऱ्या मुखेड येथील शासकीय रुग्णालयातील कोविड विभागात रुग्णास भेटायला आलेल्या भाऊसाहेब गायकवाड हा व्यक्ती वॉर्डात मोठं मोठ्याने बोलत असल्याने एका रुग्णाने हळू बोला अशी विनंती केली.
यावेळी डॉक्टर,परिचारक व नर्स यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता,भाऊसाहेब गायकवाड हा थेट कर्मचार्यांच्या अंगावर धावून येत चाक काढला.यावेळी हातात चालू घेऊन त्याने झटापट केली.यावेळी लोकांनी मध्यस्थी करत हातामधील चाकु काढून घेतला.
या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या प्रकरणी ब भाऊसाहेब गायकवाड याच्यावर मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्यास अटक ही करण्यात आली.
रुग्णांचा जीव वाचावा यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर भयंकर हल्ले करण्याचा प्रयत्न केला.या यंत्रणेने काम करायचे कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थिती होत आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…