नांदेड, बातमी24ः- उमरी येथील एक साधू व सेवकाच्या हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडवून दिली होती. या घटनेपूर्वी दोन प्रकरणात त्या आरोपीवर कारवाई न करता सोडून दिल्याच्या ठपका ठेवत निलंबित करण्यात आले आहे.
उमरीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नागठाणा येथील मठाधिपती बालतपस्वी निर्वादरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज व इतर एकाची हत्या केल्याची घटना मे महिन्यांत घडली होती. या प्रकरणातील आरोपी साईनाथ लिंगाडे याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करून त्यास तेलंगणा राज्यातून अटक केली होती.
दोघांची हत्या करण्यांपूर्वी काही दिवसांमध्ये आरोपी साईनाथ लिंगाडे याने गावातील मुलीची छेड काढल्याच्या कारणांवरून तक्रार त्या मुलीच्या नातेवाईकांनी केली होती. परंतु त्यास पोलिस ठाण्यात बोलवून माफ ी मागून हे प्रकरण मिटवित त्यास सोडून दिले होते. त्यानंतर गावात कुर्हाड घेऊन फि रत असल्याचे गावकर्यांनी उमरी पोलिसांनी कळवून ही त्याकडे दुर्लक्ष करणे अशा वेगवेगळया चौकशी प्रकरात उमरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षकांनी निलंबनाचे आदेश काढले.
अशोक अनंत्रे यांच्याबाबत उमरी तालुक्यात तक्रारी खूप होत्या. या काळात वेगवेगळे अवैध व्यवसाय ही वाढले होते. असे तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. या मतदारसंघाचे आमदार राजेश पवार हे सुद्धा अनंत्रे यांच्या विरोधात दंड थोपाटून होते. कारवाई योग्य झाली पण यास उशिर झाला असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…