नांदेड, बातमी24ः– अधार्र्पुर तालुक्यातील पाटणुर येथे अजगर मारून ते फ ोटा व्हायरल केल्याप्रकरणी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
वन कार्यालयाकडून कळविण्यात आलेल्या पाटणूर ग्रामपंचायतच्या व्हाट्स अँप ग्रुपवर अजगर मारल्याचे व ते अजगर मारून तो ओढत नेत असतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोची वनविभागाने स्वतः दखल घेऊन फोटोतील 6 आरोपींची व फोटो काढून ती व्हायरल करणार्या अशा अशा सात जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये परमेश्वर दता कोकाटे, सटवाजी लक्ष्मण डुमणे, राजू अर्जुन गायकवाड, पंडित रेशमाजी येळणे, अप्पाराव पांडोजी कोकाटे, रामा बळीराम पतंगे व नागोराव मारोती मिरासे हे सर्व राहणार पाटणुर येथील रहिवासी आहेत.
सदरील कारवाई उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वनसंरक्षक डि.एस.पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी नांदेड श्रीधर कवळे, सचिन रामपुरे , वनपाल पी.ए. धोंडगे , बी.ए.हकदळे ,मानद वन्यजीव रक्षक अतीन्द्र कट्टी, वनरक्षक शिंदे , घुगे , काकडे , गव्हाणे , दासारवाड, वसीम, वाहनचालक जाधव यांनी केली.
——
चौकट
वन्य प्राणी वन्यजीव संरक्षक अधिनियम, 1972 च्या अनुसूची 1, भाग 2 मधील प्राणी असून त्याची हत्या केल्यास 3 वर्ष पर्यंत तुरुंगवास व/ किंवा 25000/- पर्यंत द्रव्य दंड लागू शकतो .
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…