क्राईम

आपसी वादातून एकाचा खून; आठ दिवसात तीन खुनांच्या घटना

नांदेड, बातमी24ः सांगवी भागातील अंबा नगर येथे राहणार्‍या अनिल कांबळे यांचा आपसी वादातून खून करण्यात आल्याची घटना सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी आठ वाजेच्या सुमारास घडली. मागच्या आठ दिवसांच्या काळात नांदेड शहर व भोवताली तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत.

अंबा नगर भागात राहणार्‍या अनिल कांबळे यास पूर्व वैमनस्यातून तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात अनिल कांबळे यांचा मृत्यू झाला आहे. विमानतळ पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले, असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक ननावरे यांनी दिली.
——
मागच्या आठ ते नऊ दिवसांच्या काळात तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये गँगवारवरून विक्की चव्हाण, त्यानंतर खडकपुरा भागातील युवकाची दिवसाढवळया हत्या व सोमवारी सायंकाळी अंबा नगर येथील खुनाची घटना घडली आहे. तर तीन दिवसांपूर्वी एका अपहणकर्त्याने 12 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. पळून जाणार्‍या आरोपीस पायावर गोळी घालून जखमी करावे लागले होते.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago