नांदेड,बातमी24:- नांदेड शहर गोळीबाराने हदरले.या गोळीबारात एक युवक जखमी झाला आहे.ही घटना जुना मोंढा परिसरातील महाराज रणजीतसिह मार्केट येथे सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास घडली. पोलीस अधीक्षक म्हणून नव्याने आलेल्या प्रमोदकुमार शेवाळे यांना खंडणीखोर गॅंगने आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
मागच्या महिनाभराच्या काळात नांदेड शहर शांत होते, या काळात पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची बदली सुद्धा झाली. त्या जागी प्रमोदकुमार शेवाळे हे रुजू झाल्याच्या पंधरा दिवसांत ही घटना घडली आहे.
रविवार दि.4 रोजी दोन दुचाकीवर आलेल्या चार आरोपींनी त्या भागातील कॉर्नरवर असलेल्या टपरी चालक आकाश परिहार यांच्या पोटाच्या उजव्या बाजूस गोळी लागून गेली.यात ते जखमी झाले.पुढील उपचारास हलविण्यात आले.या आरोपींनी त्या भागातील विजय लक्षमी ट्रेडर या कापड दुकानातील गल्यातून दरोडेखोरांनी 10 हजार रुपये हिसकावले.तसेच श्रीकृष्ण,मंगलमूर्ती व दिव्या ट्रेडर्स या दुकानावर गोळीबार करत व्यापाऱ्यात दहशत निर्माण करून आरोपी फरार झाले.मागच्या काही वर्षांमध्ये नांदेड शहरात गोळीबार,लूटमार,खंडणी व अपहराण असे प्रकार घडत आहेत. घटना घडताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
——–
आरोपींचा शोध सुरू:-शेवाळे
गोळीबार प्रकरणात आरपींचा शोध सुरू आहे.असे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…