नांदेड, बातमी24:- भोकर तालुक्यातील भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्याचे दीड लाख रुपये डिक्की फोडून पळविल्याची घटना दिवसाढवळ्या घडली. विशेषतः हा प्रकार जिल्हा परिषद आवतारात घडला. चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. जिल्हा परिषद आवाराची सुरक्षा व्यवस्था तसेच सीसीटीव्ही सुद्धा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे.
भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील एमपीडब्ल्यू महादू सरोदे यांनी जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचारी पतसंस्थेचे दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. मंजूर कर्जाची रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेतून उचलून ती रक्कम आयडीबीआय बँकेच्या शाखेत भरणा करण्यासाठी सरोदे हे गेले होते.मात्र दुपारच्या भोजनाचा वेळ झाला असल्याने सरोदे हे जिल्हा परिषद मधील पतसंस्थेच्या कार्यालयात आले,असता तितक्यात मागावर असलेल्या दुचाकीवरील चोरट्यानी गाडीची डिक्की फोडून त्यातील दीड लाख रुपये रोख घेऊन पळ काढला. यावेळी सरोदे यांनी चोरट्याचा पाठलाग केला. मात्र तो चोरटा हाती लागला नाही. या प्रकरणी सरोदे यांनी वजीराबाद पोलिसात तक्रार नोंदविली.
——
जिल्हा परिषद मधील सुरक्षा व्यवस्था नावालाच आहे. तसेच येथील सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित नसल्याचे समोर आले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…