क्राईम

माहूर आगारात रापम वाहकाची बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

माहूर,बातमी24:-वाहकाने एसटी बस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना दि.२६ रोजी सकाळी ६ वा.उघडकीस आली. माहूर आगाराची परळी माहूर हि बस क्र. एमएच २० बी.एल. चाळीस पंधरा ही माहूर च्या एस टी आगारात दि.२५ च्या रात्री उभी केलेली होती. सदर बसची माहूरहून परळीकडे रवाना होण्याची वेळ सकाळी ७:३० ची असल्याने दि.२६ रोजी सकाळी ६ :०० वा.च्या दरम्यान रापमचे स्वच्छता कर्मचारी बस स्वच्छ करण्यासाठी गेले असता सदर बस मध्ये गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत वाहक संजय संभाजी जानकर हे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आगारप्रमुख व्ही.टी. धुतमल यांनी दिलेल्या माहितीवरून माहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. बिट पो.हे.कॉ. आडे, पो.हे.कॉ.मुटकुळे, पो.हे.कॉ. गंगाधर खामनकर पो.कॉ. प्रकाश देशमुख, यांचेसमवेत आडे यांनी घटनास्थळ पंचनामा केला व प्रेताचे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे पाठविले. ग्रामीण रुग्णालयात डॉ. विजय मोरे यांनी प्रेताचे शवविच्छेदन केले. सदर वाहकाची दि. २४ रोजी धनोडा येथे बस तपासणी तपासणी पथकाने केली.

त्यावेळी तिकीट मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळे काही प्रवाशांचे तिकीट निघाले नसल्याने सदर बाब वरिष्ठांनी लक्षात न घेता कारवाई करण्याचे संकेत दिल्याने पश्चाताप होऊन आत्महत्या करणाऱ्या वाहक जानकर यांनी रापम माहूर आगाराच्या व्हाटसप ग्रुपवर दि.२६ रोजी सकाळी ४:०० वा. व्हायरल केलेल्या लेखी मृत्यूपूर्व जबाबत नमूद केले आहे.

सदर वाहक हा तुटपुंजा पगारामुळे नेहमी आर्थिक विवंचनेत राहत असल्याने व यापूर्वीही काही दिवस सदर मयत वाहक हा निलंबित राहिलेला असल्याने आता पुन्हा निलंबन झाले तर कुटुंबाचे उपजीविका कशी भागवायची या विवंचनेत गेल्या दोन दिवसापासून होता अशी कुजबुज रापम कर्मचाऱ्यामध्ये होती. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांचे मार्गदर्शनात पो.हे.कॉ. विजय आडे हे करीत आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago