Categories: क्राईम

शहराच्या नजीक पुन्हा गोळीबार; गुंड विकास हटकर जायबंदी

नांदेड, बातमी24ः लोहा येथील एका बारा वर्षांच्या वर्षांच्या मुलाचे अपहरणार्‍या गुंडापासून त्या मुलाची पोलिसांनी सुखरुपने सुटका केली. या वेळी पोलिसांच्या दिशेने कुख्यात गुंड विकास हटकर याने गोळीबार केला. या वेळी पोलिसांनी प्रतिउत्तरात केलेल्या गोळीबारात विकास हटकर याच्या पायात गोळी लागल्याने तो जायबंदी झाला. या प्रकरणी तीन जणांना ताब्या घेण्यात आले तर अन्य काही जण घटनास्थळावरून फ रार झाले. ही थरारक घटना निळा रोडवरील सम्राट हॉटेलसमोर घडली.

नांदेड शहर व भोवतालच्या परिसरामध्ये गुंडगर्दी व गॅगवारचे स्वरुप आले आहे. रविवारी रात्री विक्की चव्हाण याची हत्येनंतर गुरुवारी दिवसाढवळया एका इसमाचा खून करण्यात आला आहे. त्यापूर्वी एक दिवस अगोदर पिस्टल जप्त करण्यात आला होता. या तिन्ही घटना ताज्या असताना लोहा येथील एका बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्या मुलास निळा रोडवर आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिस आल्याचे पाहून विकास हटकर यांने गोळीबार केला. या वेळी पोलिसांनी प्रतिउत्तर केलेल्या गोळीबारात विकास हटकर याच्या पायात गोळी लागली. त्यामुळे तो व अन्य एक जण पोलिसांच्या हाती लागले. अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चिखलीकर यांनी दिली. विकास हटकर याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे पंधराहून अधिक गुन्हे असल्याचे सांगण्यात आले.
——
सूचनाः यासंबंधीचे अधिक वृत्त थोडयाच वेळात

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago