नांदेड, बातमी24ः काही दिवसांपूर्वी तेरा लाख 10 हजार रुपयांची बँग हिसकावून पळून गेलेल्या आरोपीस पकडण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले, असून त्याच्याकडून सात लाख 10 हजार रुपयांचा नगद रोकडही हस्तगत केली आहेत.
भाग्य नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि. 20 ऑगस्ट रोजी राजू गोविंदराव मोरे हे जात असताना त्यांच्याकडे असलेली बॅग हिसकावली होती. त्या बँगमध्ये तेरा लाख 10 हजार रुपये एवढी रक्कम होती. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती.या गुन्हयातील आरोपी हे अदिलाबाद जिल्ह्यातील इच्छोडा येथे असल्याची पोलिसांना मिळाली, यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांचे पथक रवाना झाले.
या वेळी पथकाने संपत रामकिशन मुंडे रा. इच्छोड अदिलाबाद व दुसरा आरोपी महेश नारायण वजीरगावे रा. मरवाळी ता. नायगाव यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यात तेरा लाख रुपयांची बँक चोरी केल्याची कबुली देत, त्यातील 7 लाख 10 हजार रुपये परत केले. या दोन्ही आरोपीनां नांदेड येथे आणण्यात आले, असून त्याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक चिखलीकर यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…