नांदेड, बातमी24ः नांदेड शहर व भोवतलाच्या परिसरात लुटमार, अपहरण, गुंडगर्दी, गँगवारने फ ोफ ावत चालला आहे. एखाद्या मालिकाचा पट समोर यावा, तसे दिवसाआड घडत आहेत. एका बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियास वीस लाख रुपयांची मागणी केली गेली, अन्यथा मुलास मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाळत ठेवून योग्य ती कारवाई केल्याने त्या बालकाचे प्राण वाचले, शिवाय कुख्यात गुंड सुद्धा पोलिसांच्या हाती लागला.
लोहा येथील बालाजी मंदिर परिसरात राहणार्या जमुनाबाई संतोष गिरी यांचा मुलगा शुभम गिरी याचे दि. 5 रोजी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी मुलाच्या आईकडे वीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली. अन्यथा मुलास मारून टाकू अशी धमकी देण्यात येऊ लागली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून गंभीर दखल घेण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक भारती यांनी या प्रकारावर बारकाईन लक्ष ठेवत आरोपींवरील पाळत वाढविली.
अपहरण करणारा आरोपी हा विकास हटकर हाच असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखेला पटली. हे सर्व आरोपी हे निळा रोडवरील महादेव नगर भागात असल्याचे मोबाईल टॉवरवर लोकेशन दिसून आले. त्या दिशेने स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचा मोठा फ ोजफ ाटा घटनास्थळाकडे दाखल झाला. चारही बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली. पोलिस मागावर असल्याचे आरोपी विकास हटकर याच्या लक्षात आल्यानंतर तो शुभम गिरी यास घेऊन तो पळत सुटला. पोलिसांनी थांबण्यास सांगितले. न थांबल्यामुळे पोलिसांना विकास हटकर याच्या दिशेने गोळी झाडावी लागली. ही गोळी उजव्या पायात घुसल्याने तो जागीच पडला. त्यामुळे शुभम गिरी या बालकाची सुखरुप सुटका झाली. जखमी गुंड विकास हटकर याच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली, तर अन्य दोन जण पळून गेले. त्यांचा शोध पोलिसांकडून केला जात आहे.
——
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…