जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24: काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार यांचा गब्बर चित्रपटातील एका रूग्णालयात मयत रुग्णांवर केवळ पैसे उखळण्यासाठी उपचार करण्याचे नाटक केले जाते आणि रुग्णालयाचा बोगसपणा कागदोपत्री पकडला जातो,अगदी तशीच घटना नांदेडच्या गोदावरी रुग्णलयात मयताच्या बाबतीत घडली असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाने 18 रोजी मध्यरात्री गुन्हा नोंद झाला आहे.
सिडको भागातील विणकर कॉलनीत राहणारे शिक्षक अंकलेश पवार हे कोरोनाचा संसर्ग झाल्याने दि.16 एप्रिल रोजी गोदावरी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.सिटी स्कॅन केला असता स्कोर 7/25 असा होता. तंबीयत उत्तम होती.मात्र डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला.
या दरम्यान दि.20 रोजी तब्यात अधिक खालावल्याने अंकलेश पवार यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रेडिसिव्हीर इंजेक्शन देणे आवश्यक असताना दिले गेले नाही.उलट मला मानसिक त्रास व्हावा, यासाठी 35 हजार रुपये किमतीचे इंजेक्शन आणायला सांगितले.त्याच वेळी मला रूग्णालयाकडून फिस भरण्यास सांगण्यात आले.मयत अंकलेश पवार यांची पत्नी शुभांगी पवार यांनी तक्रारीत नमूद केले.मात्र पैसे भरण्यास मुदत मागितली असता,24 तारखेपर्यंत मुदत दिली गेली.
शुभांगी पवार यांनी ऑनलाईन 50 हजार व नगद 40 हजार रुपये दि.24 रोजी सकाळी दहा वाजता भरले होते.पैसे भरल्याच्या दोन तासानंतर म्हणजे 12 वाजता रुग्णालयाकडून अंकलेश पवार हे मरण पावल्याचे घोषित करण्यात आले.
कुटूंबने मृत्यू प्रमाणपत्र व डेड बॉडी देण्याची मागणी केली असता,ते रुग्णलयाकडून देण्यात आली.मृत्यू प्रमाणपत्र दुसऱ्या दिवशी तपासले असता,अंकलेश पवार यांचा मृत्यू हा दि.21 एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता झाल्याची नोंद होती.
रुग्ण दि.21 रोजी दगावला असताना सुद्धा रुग्णावर उपचार सुरू आहेत,म्हणून मेडिकल बिल व रुग्णालय बिल उखळण्यात आले.त्याचसोबत मयत बॉडीचा अवमान केला असल्याची तक्रार केली गेली,यासाठी शुभांगी पवार यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली असता, न्यायालयाने गोदावरी रुग्णलयावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले,त्यानुसार मंगळवार दि.18 रोजी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
——
चौकट
शासनाने थटवून दिल्याप्रमाणे बिल आकारणे आवश्यक होते.पण 1लाख 40 हजार रुपये बिल स्वरूपात आकारले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…