नांदेड, बातमी24ः मागच्या काही वर्षांमध्ये नांदेडच्या प्रतिमेला गँगवार, गुंडगर्दीने मोठे तडे गेले आहेत. यातून नांदेड शहराची प्रतिमा मुंबई व पुण्यातील अंडरवर्ड सारखी होऊ लागली आहे. यातून शहराविषयी होत चालेली मल्लीन प्रतिमा चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे नांदेडमध्ये चाललय तरी काय असा प्रश्न सामान्य नागरिक, व्यापारी, हातावर पोट असणारे मजूर व कर्मचारी वर्गाला पडू लागला आहे.
नांदेड शहराच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक शहराची शांतता मागच्या काही वर्षांमध्ये भंग होत चालली, असून ती आता अंतर्गत गुंडगर्दी, गँगवार, दरोडे, लुटमार, खंडणीसाठी केले जाणारे गोळीबारात रुपांतरीत झाली आहे. मराठवाडयात नांदेड हे शहर बदनामीकारक ठरत आहे. काही वर्षांमध्ये पूर्वी वैमनश्यातील खुनाच्या घटनेचे रुपांतर गँगवार आणि आता खंडणीखोरीत झाले आहे. गोळया मारून जायबंदी करून मोठी दहशत व्यापारी व सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण केली जात आहे.
गल्ली-बोळात मोकाट तरुणांच्या दादागिरी करणार्या गँग उभ्या राहत आहे. या अशा गँग उभ्या राहण्यामागे महत्वाचे कारण ठरत आहे. ते शहर व भोवताली सुरु असलेले मटका, पत्ते क्लब, अवैध दारू व आमलीपदार्थाचा व्यवसाय होय. यातून पैशाची होणारी उलाढाल मोठी असल्याने रोज तीनशे ते चारशे रुपये कमविणारा अवैध धंदातून रोज दोन ते चार हजार रुपये कमवू लागला आहे. त्यातून भाईगिरी, दादागिरी व खंडणीसारखे प्रकारांला प्रोत्सहन देत आहे.
आजघडिला शहरात कुणालाकडे अवैध पिस्टल मिळेल याचा भरवसा राहिला नाही. नांदेड शहर हे गावठी पिस्टलचे मोठे अवैध व्यापार केंद्र झाले आहे. पूर्वी खंजीर, तलवारीसारखे शस्त्र शहरात मिळत असत. आता बंदुकीचा काळा बाजार ही फ ोफ ावला आहे. या जोरावर गुंडगर्दी वाढत चालली, असून गोळीबार, खून, दरोडा व लुटमारीचे प्रकार डोकेवर काढत आहेत.
गुंड विक्की चव्हाण यांची झालेली हत्या हे त्याचे एक धोतक होते. मागच्या आठवडयात सराफ ा दुकानावर टाकलेला दरोडा हा वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही, मागच्या आठवडया भरात दोन पिस्टल जप्त करणे,या सगळया घटना घडामोडीत पाहता नांदेडमध्ये चाललय तरी काय असा प्रश्न सामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. पोलिसांनी अवैध धंदावर नैतिक भूमिका म्हणून अंकुश आणला तर शहरातील गुंडगर्दी कमी होऊ शकते. मात्र हप्तेखोरी यास आड येत आहे. पोलिसांनी मनावर घेतल्यास सर्व काही शक्य आहे. परंतु पोलिसांना तशी हिमत दाखवावी लागेल. येथील राज्यकर्त्यांनी ही खाकीला साथ दिली, तर शहरात जे काही सुरु आहे. त्यावर अंकुश लागू शकेल. अन्यथा शहराची प्रतिमा बदनामीकारण ठरतेय यास कुणीही रोखू शकणार नाही.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…