नांदेड, बातमी24ः शहरातील गुंडगिरीला पोलिसांकडून जशास तसे उत्तर दिले जाणार असून यात कुणाची ही गय केली जाणार आहे. अशा इशारा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कुख्यात गुंड विकास हटकर याने लोहा येथील बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागणी होती. या प्रकरणी पोलिसांनी त्या बालकाची सुटका करताना पळून जाणार्या विकास हटकर याच्यावर पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी पायात गोळी मारून जखमी केले. त्यामुळे जायबंद झालेला विकास हटकर पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी अन्य दोन जणांना ही कालच अटक करण्यात आले होते.
या कारवाईच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात शनिवार दि. 8 रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी ते बोलत होते. मगर म्हणाले, की शहरात वाढत असलेली गुंडगर्दी खपवून घेतली जाणार नाही. गुंडगर्दीचे येणार्या काळात उच्चाटन केले जाईल, यासाठी जशास-तसे उत्तर मिळेल, असा इशारा मगर यांनी दिली. या प्रकरणातील आरोपींना मोक्का कायद्या लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
——
दोन किलो सोन असल्यावरून अपहरण
अपहरण केलेल्या बालकाच्या आईकडे दोन किलो सोने असल्याची माहितीवरून अपहरण करण्यात आले.यासाठीच वीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र ते आरोपींकडून शेवटी 5 लाख रुपयांची मागणी केली गेली होती.
——
प्रशासनाकडून पोलिसांना बक्षीस
कालची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी केल्याबद्दल पोलिस प्रशासनाच्या वतीने स्थानिक गुन्हे शाखेला आर्थिक बक्षीस जाहीर केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…