क्रीडा

महसूली क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांची मराठवाडाभर छाप

जयपाल वाघमारे

नांदेड,विशेष वृत्त:- नुकत्याच महसुली प्रशासनाच्या वतीने नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठवाडास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे जोरदार व यशस्वीरीत्या आयोजन करून नांदेडच्या ठसा मराठवाड्याच्या महसुली प्रशासनावर उमटविला आहे.विशेषतः नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान स्वीकारत या सर्व स्पर्धाचे नेतृत्व एकप्रकारे कर्णधार म्हणून साजेस अस बघायला मिळाल.

नांदेड येथे नुकत्याच तीन दिवंशीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप शनिवारी पार पडला. या स्पर्धेचे उदघाटन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले, तीन दिवस चालेल्या या स्पर्धेत मराठवाड्यातून महसुली विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी हजेरी लावली. मे महिन्याच्या कडकडीत उन्हाळ्यात या स्पर्धा कशा होऊ शकतील, असा प्रश्न अनेकांनी उपस्थिती केला,मात्र या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन व नियोजन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या टीमने करून दाखविले.यातून नांदेडच्या महसूल प्रशासनाचे टीम वर्क ही मराठवाडयातुन आलेल्या सर्वांना बघायला मिळाले.मराठवाडयातील सर्व आठ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी,तहसीलदार, मंडळाधिकारी,तलाठी व अन्य कर्मचारी असा मोठा त्या-त्या जिल्ह्यचे खिलाडू आले होते.

वेगवेगल्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धमुळे इतर जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी यांच्या संवाद व समनव्य घडून आला आणि या सर्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम एक मिलाप अस चित्र बघायला मिळाले.काही वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांनी या स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी घडवून आणली होती.त्यानंतर डॉ.विपीन इटनकर यांनी स्वतः पुढाकार घेत यजमानपदाचा मान भूषविला.जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्यातील आपल्या इतर जिल्ह्यातील अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्यातील मैत्रिभाव व खिळाडूवृत्ती बघायला मिळाली.

त्यामुळे निकत्याच पार पडलेल्या मराठवाडा स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या माध्यामातून मराठवाडयाच्या महसूल प्रशासनावर स्वतःची मोहर उमटल्याचे बघायला मिळाले. या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी डॉ.इटनकर म्हणाले,की या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाची श्रेय हा सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जाते असे त्यांनी आवर्जून सांगितले.

 

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago