नांदेड, बातमी24ः- गुरुवारी कोरोनाचा आकडा एकदम 30 ते 35 ने घटला आहे. त्यामुळे सामान्य जणातून व प्रशासकीय पातळीवर सुद्धा अधिकारी व कर्मचार्यांनी काहीअंशी सुटकेचा श्वास सोडला असताना आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवसभरात दोन व आतापर्यंत 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आज दिवसभरात 219 नमुने तपासले गेले आहेत. यात 186 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह तर केवळ अकरा अहवाल पॉझिटीव्ह आले.तसेच आज 27 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या 743 झाली, तर कोरोनामुक्त 439 झाले आहेत. यात वाजेगाव येथील 63 वर्षीय महिलेचा मृत्यू ही झाला आहे.
सायंकाळी कंधार तालुक्यातील फु लवळ येथील 64 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या इसमास दि. 13 जुलै रोजी भरती करण्यात आले होते. दि. 14 रोजी स्वॅब पॉझिटीव्ह आला होता.तर दि. 16 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास मृत्यू झाला.त्यामुळे आतपर्यत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 41 झाली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…