कोरोनामुळे एक मृत्यू;रुग्ण संख्येत वाढ

कोरोनामुळे एक मृत्यू;रुग्ण संख्येत वाढ

नांदेड, बातमी24ः- नांदेडमध्ये कोरोनामुळे रोज एक ते दोन रुग्णांचा मृत्यू होत असून गुरुवारी विजयनगर भागातील एका वृद्ध इसमाचा मृत्यू झाला. तर कोरोनाचे नवे 13 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या अहवालानुसार कोरोनाच्या रुग्णांची संख्या 524 झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 24 जण मरण पावले आहेत.

कालच्या तारखेत दि. 8 जुलै रोजी जिल्ह्यात 27 रुग्ण सापडल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले होते. तर गुरुवारी 112 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्ये 90 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 13 जणांचे स्वॅब हे कोरोना पॉझिटीव्ह आले. कोरोना पॉझिटीव्ह आलेले सर्व रुग्ण नांदेड शहर व ग्रामीण भागातील आहेत. तसेच 12 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 353 इतकी आहे.


——
तब्बल आठरा रुग्ण गंभीर
नांदेड जिल्ह्यात जशी-जशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.त्याचप्रमाणे गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे. यामध्ये 10 महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे.
——
कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा तपशीलवार

पत्ता———स्त्री/पुरुष————वय
1)देगलूरनाका—-पुरुष————–25

2)वाघी(नांदेड)—स्त्री—————25

3)नाथ नगर(मुखेड)-पुरुष————-06

4) नाथ नगर(मुखेड)-स्त्री————-31

5) मुदखेड——–पुरुष————33

6) चाळीसगाव—–पुरुष————-25

7)लक्ष्मीनगर——-स्त्री————-24

8)लक्ष्मीनगर——-स्त्री————-27

9)लक्ष्मीनगर——-स्त्री————-45

10)हसापुर(नांदेड)–स्त्री————–45

11) मोहसीन कॉलनी–स्त्री————-47

12)धनगर टेकडी—–पुरुष————42

13)धनगर टेकडी—–पुरुष————45
——

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

4 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago