नांदेड,बातमी24:- नांदेड तालुक्यातील 65 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली.
नांदेड तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीसाठी 15 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत निहाय अर्ज दाखल करण्यासाठी चार हॉलमध्ये 26 टेबल करण्यात आले आहेत.यासाठी 78 कर्मचारी तैनात असणार आहेत.यामध्ये महसूल,ग्राम विकास,पाटबंधारे व विक्रीकर कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे,असे तहसीलदार अंबेकर यांनी कळविले.
—–
असा असेल निवडणूक कार्यक्रम
दि.23 ते 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे.31 रोजी माघार, 4 जानेवारी रोजी छाननी व चिन्ह वाटप होणार आहे,तर प्रत्यक्ष मतदान 15 रोजी तर मोजणी 18 रोजी होणार आहे.
——-
तहसीलदारसह पाच नायब तहसीलदार यांची नेमणूक
या निवडणुकीसाठी तहसीलदार यांच्यासह पाच नायब तहसीदारांच्या खांद्यावर ही जबाबदारी असणार आहे,असे ही किरण अंबेकर यांनी सांगितले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…