मुंबई,बातमी24 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि. २० ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे. यासंदर्भाने वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने बसेस सुरू करण्यात याव्यात या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत गुरुवारपासून राज्यभरात बसेस धावणार आहेत.
परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब म्हणाले, की उद्यापासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता नाही.
प्रवासात प्रवाशांनी कोविड – १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
——-
वंचित बहुजन आघडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यभर एसटी बसेस सुरू करण्याची मागणी केली होती,या मागणीसाठी दि. 12 ऑगस्ट रोजी वंचीत बहुजन आघाडीने आंदोलन केले होते. राज्यभर व्यापक आंदोलन झाल्याने या आंदोलनाची दखल प्रशासनास घ्यावी लागल्याचे बोलले जात आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…