वर्षेभराच्या काळात बंदुकीला बंदुकीने उत्तर

नांदेड, बातमी24ः पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना नांदेड येथे येऊन वर्षे झाले आहे. या वर्षेभराच्या काळात मगर यांनी वाढत्या गँगवारचे कंबरडे मोडताना बंदुकीला बंदुकीने उत्तर देण्याचे काम त्यांनी करून दाखविले आहे. त्यामुळे मगर यांचा वर्षेभरातील गुंडाविरुद्धचा आलेख चढता राहिला आहे.

तत्कालीन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या बदलीनंतर विजयकुमार मगर हे बदलीने नांदेड पोलिस अधीक्षक म्हणून आले. या काळात नांदेडमध्ये गुंडांची गुंडगिरीने मोठे डोके वर काढले होते. खंडणीखोरीमुळे व्यापारी दहशतीमध्ये सापडले होते. या दरम्यानच्या काळात एकाचा इन्काऊटर करून अशा गँगला चांगलाच धक्का आणि इशारा दिला. त्यानंतर खंडणीसाठी गोळया मारून दशहती करू पाहणार्‍यांना रोख लागला.

बंदुकीला बंदुकीने उत्तर दिले जात असताना ही शहरात अंतर्गत टोळया ही एक झाली, एक जन्मास येऊ लागली. या टोळयांच्या मुसक्या आवळण्याचे काम विजयकुमार मगर यांच्या टीमने सुरु केले आहे. गुंडांचा बंदोबस्त लावत असताना नवे-नवे भाई सुद्धा जन्मास येत आहे. अशांना आवर घालण्याचे आव्हान त्यांच्या टीमला पेलावे लागणार आहे. खंडणी मागणारे 53 जण जेलमध्ये घालते आहेत. अशा गुंडाकडून 14 पिस्टल पोलिसांनी ताब्यात घेत आहेत.

गुंडगिरी संपविण्याचा विडा उचलेल्या मगर यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असे म्हणता येईल, सर्व धर्मिय उत्सव, जयंती, सण-उत्सव शांततेत पार कसे पडतील, यावर विशेष भर दिला. त्यामुळे वर्षेभराच्या काळात कुठेही जातीय तेढ निर्माण होऊन दंगली पेटल्या नाहीत, ही जमेची बाजू ठरली आहे.
——
गल्ली-बोळातील पिस्टल गँग रोखण्याचे आव्हान
नांदेड शहरात अलिकडच्या काही महिन्यांमध्ये पिस्टलचा धाक दाखवून लुटण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. असे पिस्टल गँग गल्ली-बोळात वाढत आहे. अशांना रोखण्याचे आव्हान पुढील काळात पोलिसांसमोर असणार आहे.

 

 

 

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago