नांदेड, बातमी24ः- सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी अशोक चव्हाण सेवा सेतूच्या कार्यालयाला भेट देऊन उभारणीची पाहणी केली.
अशोक चव्हाण सेवा सेतू या सुविधेचे येत्या 26 जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्यामार्फत वैयक्तिक स्तरावर सुरू होणारी ही खासगी सुविधा म्हणजे एक कॉलसेंटर असून, येथील दूरध्वनी क्रमांकावर कॉल करून नागरिकांना शासकीय कामकाजाबाबत आपल्या अडी-अडचणी किंवा तक्रारी मांडता येणार आहेत.
दररोज शेकडो नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी नांदेड येथील आपल्या कार्यालयात येतात. त्यातील अनेक अडचणी या दूरध्वनीवरून मार्गी लावण्यासारख्या असतात. त्यामुळे अशा नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या समस्या तत्परतेने सोडवाव्या, या हेतूने अशोक चव्हाण सेवा सेतूही सुविधा सुरू केली जाणार आहे. या कॉलसेंटरचा क्रमांक लवकरच जाहीर केला जाईल. प्रारंभी प्रायोगिक स्तरावर ही सुविधा भोकर विधानसभा मतदारसंघासाठी सुरू होणार आहे. नांदेड शहरात उभारल्या जाणार्या या अत्याधुनिक कॉलसेंटरची पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली व तेथील कर्मचार्यांशी चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…