नांदेड,बातमी24: उमरी तालुक्यातील रोहिदास भिमराव पवळे रा.पळसगाव येथील तरुणाची दोन्ही किडणी निकामी झाली. गेल्या वर्षापासून रोहिदास औषोधोपचारासाठी वनवन भटकत आहे. मंगळवारी सकाळी बैलगाडीतून रोहिदासला घेवून त्यांची आई पंचफुलाबाई पवळे व भाऊ पांडूरंग पवळे यांनी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर, नांदेड येथील निवासस्थानी घेवून आले. यावेळी चिखलीकर यांनी मदतीचा हात देत यापुढे रुग्णास नांदेडला घेऊन येण्यास गाडी येईल,असा शब्द दिला.यावेळी पवळे कुटूंब भारावून गेले होते.
आपल्या निवासस्थानासमोर सकाळी – सकाळी बैलगाडी घेवून कोण आले याची आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यानंतर उमरीहून तरुण रुग्ण् भेटण्यासाठी आल्याने समजल्यानंतर खा.चिखलीकर यांनी रोहिदासची भेट घेवून आस्थेवाईकपणे चौकशी केली. रुग्णाला असे बैलगाडीतून घेवून येण्यापेक्षा मला फोन करा वाहनाची व्यवस्था करतो असे आश्वासन देवून रोहिदास पवळे यास रोख आर्थिक मदत केली. यानंतरही औषोधोपचारासाठी मदत केली जाईल. चिंता करु नका असा दिलासा दिल्यामुळे पवळे कुटूंबियांना खासदार आपल्या पाठीशी असल्याचा अनुभव येताच गहिवरुन आले होते हे विशेष.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…