त्या दोन मृत्यूच्या माहितीबाबत संभ्रम कायम

नांदेड, बातमी24ः- दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू दि. 9 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास झाला असल्याचे कळविले.मात्र जिल्हा शल्यचिकित्यांच्या प्रेसनोटमध्ये त्या दोन रुग्णांचा मृत्यू दि. 11 रोजी झाला असल्याचे नमूद करण्यात आले. नेमका त्या दोन्ही रुग्णांचा मृत्यू नेमका कधी झाला. यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

भोकर येथील 33 वर्षीय महिलेचा तर बळीरामपुर येथील 28 वर्षीय तरुणाचा कोरोना मृत्यू कोरोनामुळे दि. 9 मे रोजी झाला असल्याचे सकाळी उपजिल्हाधिकारी असलेल्या नोडल अधिकार्‍यांनी कळविले होते. मात्र दि. 9 रोजी घडलेली घटनेची माहिती शनिवारी सकाळी देण्यात आली होती. उशिरा माहिती देण्यावरून प्रशासनाच्या अहवालाबाबत बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याबाबत बातमी24.कॉम ने मृत्यू दोन दिवसांपूर्वी आणि माहिती मात्र शनिवारी सकाळी या मथळ्याखाली वृत्त शनिवारी सकाळी प्रसिद्ध केले होते.

सायंकाळी आलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या प्रेसनोटमध्ये मात्र कोरोनाबाधित भोकर व बळीरामपुर येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू दि. 11 रोजी झाला असल्याचे नमूद केले आहे. दोन बडया जबाबदार अधिकार्‍यांच्या माहितीमध्ये विसंगती पुन्हा एकदा समोर आली आहे. अशा बाब पहिल्यांदाच घडली, असून यापुर्वी सुद्धा असे प्रकार घडले आहेत. एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास ती माहिती त्याच दिवशी जनतेपर्यंत कळविणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे जनतेमधून अपेक्षा व्यक्त होत आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago