जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः- कुशल प्रशासक अशी राज्यभर परिचत असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील जिल्हा परिषदेला पूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी मिळेना अशी चर्चा विरोधकांकडून होऊ लागली आहे. येथील जिल्हा परिषदेचे सीईओपद मागच्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे.
राज्यात क्षेत्रफ ळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नांदेड जिल्ह्यात सोळा तालुक्यांचा समावेश आहे. सोळा पंचायत समिती व तीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागाची आहे. तर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 63 इतकी आहे. अशा बलाढया जिल्ह्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिळणे दुरापस्त झाले आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची पुणे बदली दि. 17 मार्च रोजी झाली. तेव्हापासून आजमितीस तीन महिने होऊन गेले आहे. पूर्णवेळ आयएएस दर्जाचे अधिकारी मिळणे जिल्हा परिषदेला अवघड झाले.आतापर्यंत सीईओ न येणे म्हणजे, येथील अशोक चव्हाण यांचे जिल्हा परिषदेकडे लक्ष नसावे अशी ही चर्चा होत आहे.
नांदेडला बदली झालेला जिल्हाधिकारी बदलता आला, नांदेड-वाघाळा महानगरपालिकेला आयुक्त येऊ शकतो. मग नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त ठेवून काय साध्य करू पाहत आहेत, असा सवाल लोकांमधून उपस्थित होत आहे. सत्तेत वजनदार खात्याचे मंत्री असलेले अशोक चव्हाण सीईओ आणण्यासाठी लक्ष घातले जावे, अशी मागणी होत आहे.
——
उत्तम कारभारासाठी थेट आयएएस अधिकारी असावा
जिल्हा परिषदेचा कारभार म्हणजे, असून खोळंबा असा सुरु आहे. अशोक काकडे यांनाही फ ारसे काही करता आले नाही. तर प्रभारी सीईओ डॉ. शरद कुलकर्णी हे तर स्वाक्षर्याचे धनी आहेत. कोरोनासारख्या महामारीत जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने खरेदी वगळता बघ्याची भूमिका वटविली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…