नांदेड, बातमी24:- एक दिव्यांग खाली आला, असून तो वर चढत येऊ शकत नाही, असा निरोप कर्मचार्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिला. डॉ. इटनकर यांनी क्षणाचा ही विलंब न करता खाली उतरत आले, एक दिव्यांग गेटसमोर जिल्हाधिकार्यांची स्केच केलेली प्रतिमा घेऊन बसल्याचे पाहून डॉ. इटनकर यांना आश्चर्य वाटते. हे काय आहे, असे विचारल्यास दिव्यांग बांधव म्हणतो, साहेब आपण कोरोनाच्या महामारीत जीवाची पर्वा न करता लढत आलेल्या योद्धाच्या सन्मान असल्याचे म्हणतो,हे ऐकूण डॉ. इटनकर हे भारावून जाऊन जात नम्रपणे त्या प्रतिमेचा स्विकार करतात.
नांदेड तालुक्यातील बळीरामपुर येथील सिद्धार्थ जमदाडे हा युवक जन्मजात ऐंशी टक्के अपंग आहे. सध्या कोरोनाचे संकट घरकरून बसले, असताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे तन-मन आणि जिवाची पर्वा न करता कष्ट उलचत आहे. एक जिल्हाधिकारी पायाला भिंगरी बांधून कोरोनामुक्तीसाठी लढत असेल, तर आपण ही त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे, यासाठी सिद्धार्थ याने डॉ. इटनकर यांचे पेन्टींग केले.
हे पेन्टींग आपण स्वतःजाऊन भेट दिली पाहिजे, ही संकल्पना त्याच्या डोक्यात आली. पेटींग घेऊन हा युवक जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सोमवार दि.22 जून रोजी पोहचला. मात्र पायर्या चढून वर जाणे अशक्य असल्याने या युवकाने जिल्हाधिकार्यांना भेटण्याची इच्छा आहे.परंतु मी वरती चढू शकत नाही, आपण निरोप देता का अशी विनंती कर्मचार्यास केली. त्या कर्मचार्याने कशाचा ही विलंब न करता साहेबांना निरो दिला.
डॉ. इटनकर यांनी ही कोण्या दिव्यांगाच निवेदन, मागणी किंवा तक्रार असू शकते, या उद्देशाने खाली आले. तीन चाकी सायकलमध्ये बसलेल्या दिव्यांगास बोला काय काम काढले, असे विचारले. यावर तो दिव्यांग सिद्धार्थ म्हणाला…साहेब काम काही नसून आपण कोरोनाच्या लढाईत करत असलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी आलो. हातात प्रतिमा देता तर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांचे उभेउभ चित्र रेखाटलेली प्रतिमा देता.
हे सगळ डॉ. इटनकर यांना आश्चर्यात टाकणारे असते. दिव्यांग काम न सांगता, माझा आणि माझीच स्केच केलेली प्रतिमा देता, हे पाहून त्यांना काही क्षण विश्वास बसत नाही. आनंदाने चकित होऊन स्विकारत करत सिद्धार्थचे मोठया मनाने आभार मानतात. हे पाहणारे काही अधिकारी, कर्मचारी व अभ्यांगत मंडळी आश्चर्य व्यक्त राहिली.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…