नांदेड, बातमी24ः शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना सेवा व सुविधांबाबत ओरड सुरु असताना काही खासगी रुग्णालयांनी कोरेानाच्या उपचाराखाली लुटमारीचे अधिकृत केंद्र उभारले, असून यास प्रशासनाची मुक सहमती आहे काय? असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचार जात आहे. भाजपकडून खासगी रुग्णालयांच्या लुटीबाबत आवाज उठविला जात असताना काँग्रेस गप्प कशी काय असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.
कोरोना आजारावर अनेक मत-मत्तांतरे आहेत. सुरुवातीच्या काळात खासगी रुग्णालयाची डॉक्टरमंडळी कोरोनाच्या भितीपोटी कुलूप लावून घरात बसली. केवळ मरणाची भिती त्यांच्या मनात होती. परंतु हळूहळू कोरोनाला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता जेव्हा वाटली नाही,तेव्हा ही डॉक्टर मंडळींनी चक्का खासगी कोरोना रुग्णालय सुरु केले. यातून रुग्ण बरे होण्यापेक्षा रुग्णांची आर्थिक लुट कशी करता येईल, या एकमेव अजेंडा त्यात राहिला. यास प्रशासनाने मुक सहमती दिल्यासारखे झाले.
शासनाच्या बिलासंबंधी नियम असताना पक्की बिल शासनाच्या नियमाप्रमाणे आणि कच्चे बिल देऊन मोठी लुट करण्याचा प्रकार या खासगी रुग्णालयांनी चालविला. बिलासंबंधी भांडाफ ोड रुग्णांनी यापूर्वी केला आहे. बिलांसंबंधी चौकशी करणारी समिती ही सुद्धा चिरीमिरी घेऊन खिसे गरम करत आहे. त्यामुळे आतापर्यंत तेरी भी चूप और मेरी चूप असेच सुरु आहे.
या विरोधात भाजपने आवाज उठविला आहे. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली. तसेच भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी सुद्धा निवेदन दिले आहे. या गंभीर विषयाची भाजपकडून दखल घेतली जात असताना काँग्रेससह इतर अन्य पक्ष मुग गिळून आहेत. असे रुग्णालय चालविणारे डॉक्टर हे काँग्रेसच्या आशिर्वादावर धंदे चालवित असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे रुग्णांची लुट करणार्या डॉक्टरांविरोधात काँग्रेस भूमिका घेणार काय याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…