कोरोना फटका;माळेगाव यात्रेतील विविध प्रदर्शन, कार्यक्रम रद्द:-सीईओ ठाकूर यांची माहिती

नांदेड,बातमी24 :- कोविड-19 परिस्थिती लक्षात घेता यावर्षी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा व उत्सावाच्या अनुषंगाने विविध बाबींवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंध केले आहे. या निर्गमीत मार्गदर्शक सूचनेनुसार यावर्षी माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्यावतीने भरवण्यात येणारे विविध विभागाचे स्टॉल, कृषि प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बचतगटांच्या वस्तु प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही. याची शेतकरी, पशुपालक, भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनी केले आहे.

जिल्ह्यात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील श्री खंडेरायाची देवस्वारी (पालखी सोहळा) सोमवार 11 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. येथून 4 दिवस माळेगाव यात्रा महोत्सव भरविला जातो परंतु सध्या कोविड-19, शासन अधिसूचना 21 सप्टेंबर 2020 नुसार व जनावरात होणारा लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी यात्रेत भरविण्यात येणारे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे स्टॉल, कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन बचतगटांचे वस्तु प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांनी करावे, असेही आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago