विद्यार्थी संरक्षण आणि सुरक्षा महत्वाची-सभापती बेळगे

नांदेड, बातमी24:– कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव थांबवित असताना शाळा सुरू करण्याबाबत विचारविनिमय केला जात आहे. त्यापूर्वी विद्यार्थी सुरक्षा व संरक्षण महत्वाचे आहे, यांची प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत दिल्या.
शिक्षण समितीची बैठक मंगळवार दि.23 रोजी घेण्यात आली.या बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगिर,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्यासह जिल्ह्यातील पंचायत समितीचे सर्व गटशिक्षणाधिकारी व दोन्ही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीला मार्गदर्शन करताना श्री.बेळगे म्हणाले,की कोरोनाचे प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या भागातील शाळा सुरू करण्यात येऊ नयेत.तसेच ज्यादा विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा सुरू करू नयेत.
शाळा सुरू करण्यापूर्वी दोन्ही शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय दौरा करावा,जेणेकरून शाररीक दुरु राखूण शाळा सुरू करता येतात का,तसे असेल तर शाळा सॅनिटायझर करून निर्णय घ्यावा,त्यासाठी त्या-त्या गावातील  शाळेवर असलेल्या शिक्षकाना गावी राहणे बंधनकारक ठरणार आहे, अशा सूचना बेळगे यांनी दिल्या.
या बैठीकला गतशिक्षणाधिकारी आडे,विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी,शिंदे,इंगळे,मेकाले,जाधव,निझाम,आमदूरकर आदींची उपस्थिती होती
जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago