जिल्हाधिकार्‍यांचा आदेश खासगी रुग्णालयाने गुंडाळला

नांदेड, बातमी24ः- नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोनाच्या लक्षणे विरहित रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार न करता अशा रुग्णांना कोविड केअर सेंटर येथे उपचारास वर्ग करावे असे आदेश काढले होते. या संबंधीचे आदेश आशा नामक रुग्णालयाकडून अंमलबजावणीच्या दुसर्‍याच दिवशी गुंडाळल्याचे दिसून येत आहे.

लक्षण विहरीत रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करून घेऊ नये, असे पत्र जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रविवार दि. 19 जुलै रोजी काढले होते. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सदरच्या रुग्णांना अवाश्यक औषधोपचार व वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर अवाश्यक उपाययोजना करण्यात येत, असून जिल्ह्यातील कोणात्याही खासगी रुग्णालयात लक्षणे विरहित कोरोनाग्रस्त रुग्णांना भरती करून घेऊ नये,ख अशा रुग्णांचा औषधोपचार जिल्हा शल्यचिकित्सकांच्या देखरेखी खालील कोविड केअर सेंटर येथे करण्यात येणार असल्याचे पत्र आयएमए अध्यक्षांना उद्देशून काढले आहे.

हे पत्र काढल्या दुसर्‍या दिवशी म्हणजे, सोमवारी एक बडी राजकारणी व्यक्तीस कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने, त्या रुग्णास आशा हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांनी म्हटल्याप्रमाणे लक्षण विरहित अशा रुग्णांना खासगी रुग्णालयाची आवश्यकता नसून कोविड केअर सेंटर येथे उपचारास पाठवून देण्यात यावे, असे आदेश असताना ते आदेश पाळले गेले नाहीत.
——
प्रत्येक जण आरोग्याची काळजी घेत असतो. शासकीय रुग्णालयात उत्तम व दर्जेदार सुविधा मिळत नसल्याने खासगी रुग्णालयाकडे वळतात. कोण कुठे उपचार घ्यावे ही व्यक्तीक बाब असते. त्यामुळे कोण कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यायले हे महत्वाचे नसून अत्यावश्यक व समाधानकार सुविधा रुग्णास मिळतात काय? यास महत्व असते.त्यामुळे कुणाच्या उपचाराबद्दल आक्षेप नसून जिल्हाधिकार्‍यांचे आदेश खासगी डॉक्टर्स पाळतील काय? याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

2 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago