प्रेमीयुगलांनी संपविली जीवनयात्रा

बिलोली, बातमी23-बिलोली तालुक्यातील केरूर येथील विवाहित तरूणी आणि किनाळा येथील तरूणाने देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रामध्ये उडी घेऊन जीवयात्रा संपविली.ही घटना मंगळवार दि. 23 जून रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील केरूर येथील विवाहित भाग्यश्री पिराजी चिमणापुरे (वय.19 वर्षे.) हिचे विवाहपूर्व संबंध किनाळा येथील तरूण प्रविण त्र्यंबक कौठकर (वय.21 वर्षे) याच्याशी होते. मागच्या महिन्यात या विवाहितेचा विवाह दि.29जून रोजी धर्माबाद तालुक्यातील चोंडी येथील तरूणासोबत झाला होता. सदरच्या विवाह त्या विवाहितेचा विरोध होता.

मयत विवाहित भाग्यश्री व तिचा प्रियकार प्रवीण याने
पलायन करून देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रात एकमेकांना ड्रेसच्या ओढणीने घट्ट बांधून दुपारी एक वाजेच्या सुमारास नदीपात्रामध्ये उडी मारली.या घटनेची माहिती होताच नदीपात्रा भोवती लोकांनी गर्दी केली होती.

इच्छेविरुद्ध हा विवाह करण्यात आल्याने मयत भाग्यश्री सासर येथून माहेरी जाते म्हणून दि.22जून च्या मध्यरात्री घरातून निघून आपल्या प्रियकरासोबत पलायन केले.आपण एकमेकांपासून दुरावलो, अशी भावना मनात त्यांच्या निर्माण झाली. त्यामुळे दि.23 जून रोजी नदी पात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली.

मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.मयत मुलीचे वडील मरीबा चिमनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मूत्युची नोंद करण्यात आली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago