नांदेड, बातमी24:- भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे मुहूर्त साधत शुक्रवार दि.17 सप्टेंबर रोजी जिल्हाभर व्यापक स्वरूपात कोरोना लसीकरण अभियान राबविण्यात आले.यामध्ये 55 हजार जणांनी स्वतःचे लसीकरण करून घेत कोरोना मुक्तीच्या लढ्यात महत्वपूर्ण सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या नेतृत्वात प्रशासनाने उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आले.
कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करत असताना लसीकरण करणे या लढाईतील महत्वाचा टप्पा मानला जातो. त्यासाठी शासनाच्या वतीने लसीकरणाच्या कामावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. आरोग्य यंत्रणा यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.
नांदेड जिल्ह्यात बऱ्यापैकी लसीकरण झाले,असून मधल्या काळात लसीकरणाच्या अभियानाकडे लोकांनी पाठ फिरवली, त्यामुळेत टक्केवारी सारखा चढ उतार जाणवत आला.
जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढली पाहिजे,यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभाग,महापालिका रुग्णालय, तसेच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालग अंतर्गत लसीकरणाचे शुक्रवारी महाअभियान राबविण्यात आले. या माध्यमातून आज मनपा क्षेत्रात 5 हजार 102, ग्रामीण भागातून 39 हजार 778,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय असे 99 हजार 994 असे एकूण 54 हजार 874 जणांचे लसीकरण झाले आहे.एकाच दिवशी 50 हजराहून अधिक रुग्णांचे लसीकरण होण्याची ही पहिलीच वेळ असून हा अमृतयोग डॉ.विपीन इटनकर यांनी प्रशासनाच्या माध्यमातून घडवून आणला.
जिल्ह्यात व्यापक प्रमाणात लसीकरण अभियान यशस्वी केल्याबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी लसीकरण घेतलेल्या नागरिकांचे तसेच या कामासाठी परिश्रम घेतले आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…