नांदेड,बातमी24ः– कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणार्या रुग्णांची संख्या घटत आहे. रविवार दि. 5 जुलै रोजी 11 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे घरी परतले आहेत. 428 रुग्णांमधून 20 दगावले तर 321 जण घरी परतले.
कोरोनाच्या दृष्टीने रविवारची सकाळी धक्का देणारी ठरली. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बिलोली येथील 65 वर्षीय महिला व देगलूर येथील 53 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला. त्याचसोबत 59 अहवालांपैकी 52 अहवाल निगेटीव्ह तर पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. यात उमरी कॉलनीमधील 32 वर्षीय पुरुष, हबीबिया कॉलनीतील 24 वर्षीय महिला, नांदेड तालुक्यातील हस्सापुर येथील 65 वर्षीय पुरुष तर हिंगोली येथील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे उपचार घेणार्या रुग्णांची संख्या 87 झाली आहे.
कोरोनावर मात करणार्या 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये देगलूर कोविड केअर सेंअर येथील 01, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 09 व सोलापुर येथील संदर्भीत पाच वर्षीय बालकाने सुद्धा कोरोनावर मात केली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात करणार्या रुग्णांची संख्या 321 झाली आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…