श्रीक्षेत्र माळेगाव, बातमी24:-उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेरुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्दतीने यंदाही माळेगावच्या श्रीखंडोबा रायाच्या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानक-यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पुजा करण्यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे पाटील, आशाताई श्यामसुंदर शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जिल्हा परिषद खाते प्रमुखांची उपस्थिती होती. त्यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्वारी काढण्यात आली यावेळी
मानक-यांचा गौरव –
पालखीचे मानकरी गणपतराव मल्हारी नाईक (रिसनगाव), खुशाल भगवान भोसीकर (पानभोसी), व्यंकटराव मारोती पांडागळे (शिराढोण), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे मुकदम पानभोसी, नागेश गोविंदराव महाराज कुरुळा, पांडुरंग नारायण पाटील, माळेगाव, विजयकुमार शंकरराव कनकदंडे आष्टूर या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्यात आला.
खंडोबा यात्रेत वाघ्या-मुरळी –
उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेजूरी उत्तराची जेजूरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करते.
पारंपारीक पध्दतीने कवडयाच्या माळा, माळी लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग् सकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, व्ही. आर। पाटील, नारायण मिसाळ, रेखा काळम-कदम, उप विभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गट विकास अधिकारी एस. एच. वाव्हळे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, संजय कऱ्हाळे, विजय धोंडगे आदींची उपस्थिती होती.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…