देश

खासदार राजीव सातव यांचे निधन;कुशल नेतृत्व हरपल्याची भावना

 

पुणे, बातमी24:- राज्य सभा खासदर तथा काँग्रेस पक्षाचे नेते राजीव सातव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे रविवारी पहाटे निधन झाले. राजीव सातव यांच्या रूपाने मराठवाड्याने उमदे नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया राज्यभरातील नेत्यांनी व्यक्त केली.

मागच्या काही दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालय येथे उपचार सुरू होते.रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथुन त्यांच्या राजकीय जीवनास सुरुवात झाली.पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य,नंतर सभापती,आमदार,हिंगोली लोकसभा खासदार व 2020 मध्ये ते राज्यसभा सदस्य महाराष्ट्रमधून झाले. ते महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष व त्यानंतर युवक काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष झाले.

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे ते अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून देशभर परिचित होते.राजीव सातव हे कॉंग्रेसचे गुजरात प्रभारी होते. दीड वर्षांपूर्वी झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला नेत्रदीपक यश मिळवून दिले होते.

मराठवाड्यातून दिल्लीत काँग्रेस पक्षात मोठ वलय राजीव सातव यांनी निर्माण केले होते.अभ्यासु संसदपटू म्हणून त्यांच्याकडे बघितले जायचे.त्यांना चार वेळा संसदरत्न पुरस्कार देऊन गौरविले गेले.त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र व मराठवाड्याचे मोठं नुकसान झाल्याची भावना राज्यातील नेत्यांनी व्यक्त केली.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago