नांदेड, बातमी24ः- कोविड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव व संचारबदीचे निकालावर सावट असल्याने यावर्षी निकाल उशिरा जाहीर झाला. नांदेडच्या आयआयबी ने पुन्हा एकदा बायोलॉजी विषयात आपल्या यशाची परंपरा कायम राखत झेंडा फडकावला आहे.
देशपातळीवर वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर नाव असलेल्या आयआयबीने वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेसाठी देशभरात मोठे नाव लौकिक मिळविलेला आहे.आयआयबीने बारावी बोर्ड परीक्षेतही प्रती वर्षांप्रमाणे यंदाही 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. बायोलॉजी या विषयात आयआयबीच्या अपूर्वा परळीकर, श्वेता बिरादार, विधी सोमाणी, प्रणव तत्तपुरे, संकेत शेळके, शिवम शिंदे या सहा विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले. या यशाचे श्रेय या सर्व विद्यार्थ्यांनी आयआयबी टीमला दिले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे आयआयबीचे संचालक दशरथ पाटील यांनी अभिनंदन केले.
आयआयबीच्या टीमने विद्यार्थ्यांकडून करून घेतलेल्या तयारीमुळे यश आले आहे. आजपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार आयआयबीच्या पाच विद्यार्थ्यांनी बायोलॉजी विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले. एका विद्यार्थ्यांने 100 पैकी 99 गुण, पाच विद्यार्थ्यांनी 100 पैकी 98 गुण घेतले, 34 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 97 गुण तर 335 विद्यार्थ्यांना 100 पैकी 90 ते 96 गुण मिळाले आहेत. आयआयबीने अनेक वर्षांपासून सर्वोत्तम निकालाची परंपरा देशपातळीवर कायम राखली आहे. आयआयबीचे अनेक विद्यार्थ्यांचे यापूर्वी सुद्धा देश टॉपर ठरले आहेत. निकालाची उज्जवल पंरपरा देणार्या आयआयबी टीम व विद्यार्थ्यांचे शिक्षण
क्षेत्रातून स्वागत होत आहे.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…