देश

जिल्ह्याचे भूमिपुत्र डॉ. रामोड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून प.बंगाला नियुक्ती…

 

पुणे, बातमी २४:-भारत निवडणूक आयोगामार्फत आसाम, केरळ, तामिळनाडू,पश्चिम बंगाल आणि पांडेचेरी मधील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी   पुणे विभागीय आयुक्त कार्यालय अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची दिनांक 5 मार्च 2021 च्या आदेशाद्वारे निवडणूक निरीक्षक ( ELECTION OBSERVER) म्हणून नियुक्ती आदेश प्राप्त झाले आहेत.ते पश्चिम बंगाल राज्यातील पूर्व वृढामन या जिल्ह्यात सेवा बजावणार आहेत.

पश्चिम बंगालश राज्यातीलनिवडणु कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोग (ELECTION COMMISSION OF INDIA) चे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्यातील 57 आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून यात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे अप्पर आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या नियुक्तीचा सुद्धा समावेश आहे.

सर्वसाधारणपणे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत निवडणुकीच्या संबंधाने सर्वतोपरी तयारी पूर्ण करण्यात येते उदाहरणार्थ मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण करून मतदारा मतदानाची टक्केवारी वाढविणे, मतदान केंद्रे निश्चित करणे, कायदा व सुव्यवस्था ची तयारी, मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करणे व त्यांचे प्रशिक्षण घेणे, मतदान यंत्र ठेवण्यासाठीची स्ट्राँग रूम व मतमोजणीची तयारी तपासणे इतर अनेक विषयाबाबत नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक हे सर्व बाबीची सखोल तपासणी करून भारत निवडणूक आयोगाकडे आपला अहवाल सादर करत असतात तसेच त्यांच्या निरीक्षणामध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या विषयांमध्ये सुधारणेसाठी सूचना करतात.

सर्व निवडणूक निरीक्षक यांना भारत निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर रिपोर्ट करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने राज्यातील सर्व अधिकारी हे त्या-त्या जिल्ह्यामध्ये रुजू होणार आहेत. डॉ. अनिल रामोड हे पश्चीमबंगाल साठी दि.28 तारखेला रुजू होण्यासाठी रवाना होणार असल्याचे समजते. त्यांचा नियुक्तीचा कालावधी हा मतमोजणी पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 2 मे 2021 अखेरपर्यंतचा राहणार आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago