नांदेड, बातमी24ः भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे दिल्ली येथे पावसाळी अधिवेशनाला रवाना झाले होते. तिथे ते कोरोना पॉझिटीव्ह आले आहे,असून त्यांच्यावर दिल्ली येथेच उपचार सुरु असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.यापूर्वी मागच्या महिन्यात खासदार चिखलीकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. संसदेच्या अधिवेशनाला जाण्यापूर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कोरोना चाचणी केली होती. यात ते निगेटीव्ह आले होते. त्यानंतर ते दिल्ली येथील अधिवेशनासाठी रवाना झाले असता, सकाळी खासदार चिखलीकर यांची चाचणी केली असती, त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्हा आला आहे. यापूर्वी मागच्या महिन्यात खासदार चिखलीकर हे कोरोना पॉझिटीव्ह आले होते.
त्या वेळी खासदार चिखलीकर यांच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.यातून ते बरे झाल्यानंतर साधारणता पंधरा ते वीस दिवस ते सार्वत्रिक कार्यक्रमात ही सहभागी झाले होते. कार्यकर्ता व पदाधिकार्यांच्या भेटी-गाठीवर भर दिला होता. विशेष म्हणजे, दि. 11 सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत ते निगेटीव्ह आल्यानंतरच दिल्लीकडे रवाना झाले होते. मात्र संसदेत अधिवेशनाला जाण्यापूर्वी करण्यात आलेल्या चाचणी ते कोरोना पॉझिटीव्ह आल्याने कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. सध्या खासदार चिखलीकर यांच्यावर दिल्ली येथेच उपचार असून प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…