नांदेड,बातमी24:- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामुहिक अत्याचारानंतर उपचारादरम्यान मरण पावलेल्या त्या पीडित कुटूंबियांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुकी करण्यात आली.या घटनेच्या निषेधार्थ नांदेड काँग्रेस कमिटीच्या वतीने योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले, यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती.
उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला होता. उपचार सुरु असतांना सदर पीडीत युवतीचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभर उमटले आहेत. काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पीडीतेच्या कुटुंबीयाची भेट घेण्यासाठी जात असतांना पोलिसांनी रस्त्यात दोन्ही नेत्यांना अडवून धक्काबुक्की करून अटक केली.
सायंकाळी शहराच्या आय.टी.आय येथील महात्मा फुले पुतळ्यासमोर योगी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध नोंदविला आहे.
यावेळी विधानपरिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ. अमरनाथ राजुरकर, आ. मोहन हंबर्डे, जि.प.अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसुदखांन, ज्योत्सना गोडबोले, जि.प.चे सभापती संजय बेळगे, विजय येवनकर, काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.
नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…
नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…
नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…
नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…
नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…
नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…