देश

आऊटलूकच्या यादीत नांदेडच्या युवकाला दिले स्थान

नांदेड, बातमी24:- भारतातील सर्वाधिक खपाचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेल्या आऊटलूक या इंग्रजी मासिकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देशातील 50 प्रतिभावंत दलित व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकणारे लिखाण प्रसिद्ध केले आहे.यामध्ये नांदेडमधील आंबेडकरी तरुणांना एकत्र करून दलित समाजातील अन्याय व अत्याचार यास वाचा फोडणारा वेळेप्रसंगी तीव्र आंदोलन छेडणाऱ्या युवकांच्या कार्याची दखल घेतली आहे.

देशातील दलित समाजातील 50 आयकॉन असलेल्या व्यक्तिमत्वाची त्यांच्या जीवनावर आधारीत कव्हर स्टोरीजला स्थान दिले आहे.या अंक 26 एप्रिल रोजी प्रकाशित होणार आहे. यामध्ये आझाद समाज पक्षाचे राज्याचे प्रमुख म्हणून काम करणारा आंबेडकरी तरुणाईमधील उधाचे राजकीय व सामाजिक भविष्य म्हणून ज्याकडे संबंध महाराष्ट्रभरातून पाहिले जाते,ते राहुल प्रधान यांच्या नावाचा सुद्धा समावेश आहे.

याचसोबत देशातील अनेक प्रसिद्ध चेहरे असून कबाली आणि काला चित्रपटाचे दिग्दर्शक पा.रंजित, ज्येष्ठ विनोदी अभिनेते जॉनी लीव्हर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, गोल्डन गर्ल हिमा दास, राधिका वेमुला (रोहित वेमुलाची आई) कडुबाई खरात, विनोद कांबळी यांच्यासह पत्रकार, साहित्यिक, राजकारण, क्रीडा, चित्रपट, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. याचसोबत राहुल प्रधान यांची स्पेशल स्टोरी या मॅगझीनमध्ये वाचण्यास मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासिक असलेल्या ‘आऊटलूक’ने नांदेडच्या राहुल प्रधान या युवकांचे सामाजिक कार्याला स्थान दिले आहे.मागच्या अनेक वर्षांपासून ते युवा पँथर नावाची सामाजिक संघटना चालवित. मधल्या काळात त्यांनी आझाद समाज पक्षात प्रवेश केला,त्यांच्याकडे चंद्रशेखर आझाद यांनी राज्याची जबाबदारी सोपविली आहे.

या मॅगझीनच्या 50 प्रतिभावंत दलित व्यक्तींमध्ये समावेश केल्याबद्दल राहुल प्रधान यांनी या मॅगझीनचे आभार व्यक्त करत अधिक उमेदीने चळवळीचे काम करण्याची ताकद लाभल्याचे  सांगितले.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago