नांदेड

ऑक्सिजन सुविधेसह 200 बेड कोविड सेंटर उभे;पालकमंत्री चव्हाण यांनी केले उदघाटन

नांदेड, बातमी24 :-भक्ती लॉन्स येथील नवीन 200 बेडच्या कोविड केंद्रातील ऑक्सीजन यंत्रणा आणि इतर साहित्य चांगल्या स्थितीत सुरु आहे की नाही यांची खातरजमा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. या दोनशे खाटांच्या भव्य कोविड हेल्थ सेंटर येथे सर्व बेड ऑक्सीजन यंत्रणेसह असून आवश्यक तो सर्व स्टाफ ही महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन दिला आहे. सद्यस्थितीत 112 जणांचा स्टाफ असून तो चार शिफ्टमध्ये कार्यरत राहणार आहे. तसेच चोवीस डॉक्टराचे पथक या जम्बो सेंटरमधील रुग्णांच्या उपचाराचे व्यवस्थापन करेल.  रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधता यावा यादृष्टीने व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोविड बाधितांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने जेवढ्या शक्य होतील त्या सर्व सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शर्थ करीत आहोत. प्रत्येक तालुका पातळीवरील आणि ग्रामीण भागात जिल्ह्यातील बाधितांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाला तत्पर राहण्याला सांगितले असून आजच्या घडीला ऑक्सीजनच्या बाबतीत कोणतीही कमतरता नसल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

भक्ती लॉन्स येथे आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देवून जम्बो कोविड सेंटरचे उदघाटन व पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती मोहीनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन आदी उपस्थित होते.

प्रत्येक तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटरसह मालेगाव, अर्धापूर सारख्या गावातील ट्रामा केअर सेंटर येथे कोविड बाधितांसाठी उपचार केंद्र सुरु करीत आम्ही  ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि परिपूर्ण करु असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.  जिल्ह्यातील रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात असून याचा तुटवडा आहे हे नाकारता येत नाही. राज्यात सर्वत्रच याचा तुटवडा असून शासनातर्फे वितरक आणि उत्पादक यांच्याशी समन्वय साधला जात आहे. जिथे आवश्यकता वाटते आहे त्याठिकाणी कायदेशिर कार्यवाही करुन मार्ग काढीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर जी काही माहिती असेल ती मिळणे आवश्यक असून यासंदर्भात प्रत्येक कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल येथे माहिती केंद्र सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केल्या.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

आंबेडकरी चळवळीच लोक नेतृत्व असलेल्या सुरेश गायकवाड यांना काँग्रेसने डावलेले;वाळूमाफियाला उमेदवारी

नांदेड,बातमी24:-लोकसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम मतांवर विजयी साकारणाऱ्या काँग्रेसने यावेळी तिकीट विक्रीचे दुकान चालविले असून अनेक ठिकाणी…

4 weeks ago

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

2 months ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

3 months ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

3 months ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 months ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 months ago